11.6 C
New York
Tuesday, November 26, 2024

Buy now

कणकवलीतीळ छप्पर घटनेनंतर मुख्याधिकाऱ्यांच्या त्या विकासकांना नोटिसा

कणकवली : शहरात श्रीधर नाईक चौक या ठिकाणी असलेल्या ७ मजली इमारतीवरील लोखंडी छप्पर वादळी वाऱ्याने उडून गेल्यानंतर कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनी उर्वरित छपरामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी छप्पर वादळी वाऱ्याने उडून गेल्याची घटना घडल्यानंतर संबंधित परवानगी दिलेल्या विकासाकांना नोटीस बजावण्यात आली आहे. अशी माहिती मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांनी दिली.

नोटीसमध्ये त्यांनी म्हटले आहे, महानंद अनंत हुन्नरे, श्री. महेश अनंत हुन्नरे तर्फे कु. मु. युनिक इंफ्रा. तर्फे श्री. प्रनील शेट्ये, व श्री. सुशांत जनार्दन दळवी या नावाने बांधकाम परवानगी देण्यात आली होती. सदर आपल्या ईमारतीची अर्धी शेड दि. २४/७/२०२४ रोजी सरकारी हॉस्पिटल समोरील वाहतुकीच्या रस्त्यावर पडल्याची दुर्घटना झाली आहे व उर्वरित अर्धी शेड पडण्याची शक्यता असल्यामुळे रहदारिस अडथळा तसेच जीवित व वित्तहानी होण्याची घटना घडू नये. सबब आपल्या ईमारतीवरील असलेली धोकादायक शेड त्वरित काढून घ्यावी. याबाबत आपण हयगय केल्यास व यामुळे कोणताही अनुचित प्रकार वा घटना घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील असा इशारा या नोटीसद्वारे विकासकांना देण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!