20.4 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

मुंबई गोवा महामार्गावर वारगाव कणकवली येथे २२ लाख ३२ हजारांची बियर जप्त

राज्य उत्पादन शुल्क कणकवली पथकाची कारवाई ; चालकाला एक दिवसाची पोलीस कोठडी

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर वारगाव कणकवली येथे वाहनांची तपासणी करत असताना टाटा कंपनीचा कंपार्टमेंट असलेला टँकर क्रमांक ( जिजे १२ एवाय २३६८ ) गोवा बनावटीच्या बियरचा साठा छुप्या पद्धतीने वाहतूक करत असताना आढळून आला. या टँकर मध्ये गोवा राज्य निर्मित बियर चे ४५० बॉक्स जप्त करण्यात आले. या कारवाईत बिअरची अंदाजे किंमत २२,३२,००० व टँकरची किंमत १३,००,००० असा मिळून एकूण मुद्देमाल ३५, ३२, ००० जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टँकर चालक प्रभूलाल भंवर लाल ( वय ४४, रा. दंतेडी, धुंवाला तहसील मांडल, जिल्हा भिलवाडा राज्य – राजस्थान याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कणकवली च्या पथकाने केली. यामध्ये मनोज शेवरे, अधिक्षक सो. सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क कणकवली विभागाचे निरीक्षक एन एल शिंदे, एस डी पाटील, दुय्यम निरीक्षक जे. एस. मानेमोड, एस एस चौधरी, सहायक दुय्यम निरीक्षक श्रीमती एस. एस. कुवेसकर, महिला जवान ब.क्र १० यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मदतनीस म्हणून श्री. खान व श्री. गावडे यांनी मदत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास एन. एल. शिंदे, निरीक्षक कणकवली करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!