कणकवली | मयुर ठाकूर : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ! या त्यांच्या या घोषवाक्यावर त्यांनी लढा उभा केला. टिळकांनी मराठा, केसरीच्या माध्यमातून जनप्रबोधनाचे काम केले. स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे विचार सर्वानी आत्मसात करुयात असे आवाहन कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केले.
कणकवली सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्त प्रतिमेला श्री. सर्वगोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता (प्रभारी) श्रीनिवास बासुतकर, उपविभागीय अधिकारी विनायक जोशी, कनिष्ठ अभियंता शुभम दुडये, कनिष्ठ अभियंता राजेश परडे, सहाय्यक अभियंता प्रतिभा पाटील, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आकाशकुमार कांबळे, वरिष्ठ लिपिक शर्मिला पराडकर, प्रफुल्ल अग्रोळी, अशोक दांडगे, प्रकाश गाडे, राहुलकुमार वानखेडे, मेघना पिळणकर, अवंतिका तांबे, अशोक चव्हाण, मानसी कांबळे, रेश्मा भालेकर, चंद्रकांत सुपे, भांडारपाल प्रदीप चिवलकर, वाहन चालक शैलेश कांबळे, शिपाई संदेश घाणेकर, चौकीदार कृष्णा गोसावी, कंत्राटी कर्मचारी अनुजा आजगावकर, प्रिया राऊळ, निशा चव्हाण, अमित राऊळ, मार्टीना म्हापसेकर, निकीता पोखरणकर, अक्षता परब आदी कर्मचारी उपस्थित होते .