8.7 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल नाला अतिक्रमण प्रश्न्नी मनसेच्या मागणीला यश

प्रशासनाने बिल्डर कडून घेतले नाला पूर्ववत करण्याचे नोटराईज हमीपत्र

कुडाळ : संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल येथील नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे भविष्यात ड्रेनेज वॉटर व पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत सर्वप्रथम मनसेने आवाज उठवला होता. नंतर कुडाळ नगरपंचायत च्या 17 ही नगरसेवकांनी अतिक्रमण प्रश्न्नी आक्षेप घेतला होता. त्याचप्रमाणे कुडाळ शहरातील जागरूक नागरिकांनी वेळोवेळी मुख्याधिकारी यांना गैरसोई बाबत विचारणा केली होती. प्रशासन आपल्या खिशात असल्याप्रमाणे वावरणारी विकासक/ बिल्डर लाॅबी यांची मुजोरी, आपले कोण काही करू शकत नाही. अशी झालेली मानसिकता मोडून काढण्यासाठी मनसेने याचा सातत्याने पाठपुरावा केला. निबंध स्पर्धा आयोजन, मुख्याधिकाऱ्यांना घेरावा, पत्रव्यवहार अशा माध्यमातून विषय लावून धरला मनसेचे नगरसेवक नाहीत, अधिकारी म्यानेज पुढे काहीच होऊ शकत नाही.असे विकासकाला/बिल्डरला वाटत होते.परंतु या आंदोलना ला सुजान/ सुशिक्षित लोकांचा वाढता पाठिंबा लक्षात घेऊन मुख्याधिकारी यांनी संबंधित बिल्डरवर अतिक्रमण काढून टाकण्यासाठी नोटीस बजावली, यावर विकासक / बिल्डर यांनी नमती बाजू घेत ओहोळ/नाला पूर्ववत करून देण्याची नोटराईज हमीपत्र नगरपंचायतला सादर केले.सोबत ओहळ/नाला कसा किती रुंदी व लांबीचा करणार याचा नकाशा पण जोडला . पावसाळ्याच्या मुदतीनंतर हे काम करणार व ओहळ/ नाला रुंद केला तरच अंतिम पूर्णत्वाचा दाखला(OC)द्यावा. असेही प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे. यावर मनसे हे आंदोलन स्थगित करत आहे. परंतु ह्या आंदोलनादरम्यान बऱ्याच कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आमच्या जवळ अनेक तक्रारी केल्या आहेत. बिल्डर नियमांना बगल देऊन कॉम्प्लेक्स बांधतात व इतर परवानगी घेतात. नंतर रहिवास्यांना सोसायटी बनवुन देऊन आपला हात बाजूला करतात. नंतर तिथे होणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतो. म्हणूनच आम्ही जनतेला आव्हान करतो आपल्याला बिल्डर कडून फसवणूक अथवा कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा तुम्हाला न्याय देण्यासाठी 100% प्रामाणिक पने आम्ही प्रयत्न करू. सोसायटी झाल्यावर काही अडचणी असल्यास कायदेविषयक मार्गदर्शन तसेच आवश्यक असल्यास मोफत वकील मनसे कडून देण्यात येईल. वारंवार नागरिकांना गैरसोय आणि नियमबाह्य काम करणाऱ्या बिल्डरचा रेरा रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न करू

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!