8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

कणकवली – नरडवे मार्गावर दुचाकीवर कोसळले झाड

दुचाकीचे मोठे नुकसान ; कोणतीही जीवितहानी नाही

कणकवली | मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार पासून सोसाटच्या वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडत आहेत. सोमवारी दुपारी १:४० वाजण्याच्या सुमारास कणकवली कनेडी – नरडवे मार्गावर एक घटना घडली. या घटनेत कनेडीहून कणकवलीच्या दिशेने येणारा हायस्कूलचा विद्यार्थी आपल्या ताब्यातील हिरो कंपनीच्या पॅशन प्रो दुचाकीवरून प्रवास करत होता. दरम्यान कणकवली नरडवे मार्गावर शिवशक्ती नगरच्या अलीकडे आला असता एका सर्व्हिसिंग सेंटरनजीक आल्यावर अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेले झाड दुचाकीवर कोसळले. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र दुचाकीचे मोठे नुकसान झाले होते.

घटनेची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायतचे कर्मचारी प्रवीण गायकवाड व रवी म्हाडेश्वर तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान कणकवली नरडवे मार्गावरील वाहतूक साधारणपणे पाऊण तास ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामगारांच्या मदतीने मार्गावर कोसळलेले झाड कटरच्या सहाय्याने कट करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

दूचाकीचे नुकसान
एक हायस्कूलचा विद्यार्थी मित्रासमवेत मार्गावरून प्रवास करत असताना मार्गावर झाड कोसळले. झाड कोसळताना दुचाकी झाडाखाली आल्याने ते झाड दुचाकीवर कोसळले. यामध्ये दुचाकीचे हॅण्डल तुटून दूचाकीचे मोठे नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

मार्गावर बरीच कोसळणारी झाडे ; संबंधीत प्रशासनाचे दुर्लक्ष

कणकवली – नरडे मार्गावर अनेक झाडे रस्त्यावर पडायला आलेली आहेत. मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते त्यामुळे संबंधित विभागाने दुचाकी वर पडलेल्या झाडाची दखल घेऊन असे संकट पुन्हा उद्भवू नये यासाठी सतर्क राहावे. तसेच मार्गावर पडायला आलेली झाडे लवकरात लवकर तोडून रस्ता सुरळीत ठेवावा, अशी मागणी देखील आता नागरिक करू लागले आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!