3.7 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

एचडीएफसी बँक शाखा कणकवलीच्या वतीने वृक्षारोपण

कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी एक पेड माँ के नाम असे आवाहन करत वृक्षालगवडी चा संदेश दिला. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला अनुसरून आणि निसर्गसंवर्धनासाठी एचडीएफसी बँकेच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून वृक्षलागवड केल्याचे बँक मॅनेजर मंगेश जाधव म्हणाले. एचडीएफसी बँक शाखा कणकवलीच्या वतीने कणकवली शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ येथे नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊवाटपही करण्यात आले. शालेय मुलांना बचतीचे महत्व बालवयात समजावे यासाठी बँक खाते उघडण्याविषयीही मंगेश जाधव यांनी माहिती दिली. यावेळी बोलताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका कल्पना मलये म्हणाल्या की एचडीएफसी बँक खऱ्या अर्थाने ग्राहकाभिमुख होत आहे. ग्राहक हा समाजाचा घटक असतो. आणि या समाजाप्रती आपली बांधिलकी जपत बँकेच्या वतीने आज आमच्या प्रशालेत वृक्षलागवड करत पर्यावरण समृद्धीचा संदेश दिला आहे.

यावेळी शाखा ऑपरेशन व्यवस्थापकश्री सिद्धेश लखान, बँकेचे कर्मचारी संदीप गजोबर, अजित पेडणेकर, प्रथमेश दळवी, शेखर सर्पे, राकेश मिरजुले, वामन कसालकर, भूषण कांबळे, शैलेश बागायातकर, चंद्रशेखर रासम, निलेश पवार, सचिन परब, शाळा क्र. ५ मधील उपशिक्षीका सौ. हर्षकला लोके, सौ. समीक्षा कोरगांवकर, अंगणवाडी मदतनीस सोनाली बिबवणेकर शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष केतकी दळवीसदस्य उज्वला जावडेकर, आशा भातकांडे, संदिशा शिगवण, गौरी पाताडे पालक दर्शना यादवसिद्धी वायंगणकर आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!