3.7 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

दुचाकीस्वाराने दोन पादचारी वृद्ध महिलांना ठोकरले ; दुचाकीस्वाराचा शोध घेणे हे आव्हान

बांदा : शहरात भरवस्तीमधील रहदारीच्या मार्गावर ‘हिट अँड रन’ ची गंभीर घटना समोर आली आहे बांदा – दाणोली मार्गावर निमजगा फॉरेस्ट चौकीजवळ गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने दोन पादचारी वृद्ध महिलांना ठोकरल्याने त्या जखमी झाल्यात. हेमलता मनोहर देसाई (७०) व वैशाली विश्वास देसाई (६८, दोघेही रा. कळणे, ता. दोडामार्ग) अशी त्यांची नावे आहेत. पैकी हेमलता देसाई या गंभीर जखमी असून त्यांच्यावर गोवा मेडीकल कॉलेजमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सदर घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. सदर अज्ञात दुचाकीस्वाराचा तपास करण्याचे आव्हान बांदा पोलिसांसमोर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हेमलता देसाई व वैशाली देसाई या आपल्या नातलगांकडे बांदा निनजगा येथे आल्या होत्या. सायंकाळी घरी जाण्यासाठी बांदा बसस्थानकावर त्या पायी येत होत्या. फॉरेस्ट चौकीजवळ आल्या असता गोव्याच्या दिशेने सुसाट येणाऱ्या दुचाकीस्वाराने प्रथम वैशाली देसाई यांच्या हाताला धडक दिली. त्यानंतर पुढे चालत असलेल्या हेमलता देसाई यांना मागाहून ठोकरले. या धडकेत त्या जमिनीवर कोसळून त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली.

जखमी वृद्ध महिलांना तसेच टाकून अज्ञात चालकाने लगबगीने दुचाकी सुरू करून बांद्याच्या दिशेने पलायन केले. त्यानंतर अपघाताच्या आवाजाने स्थानिक जमा झाले. त्यांनी दोन्ही जखमींना तत्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचार करून दोन्ही जखमींना अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात दाखल केले.

हेमलता देसाई या कळणे सरपंच अजित देसाई यांच्या मातोश्री असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. वैशाली देसाई यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी बांदा पोलिसात या घटनेची रीतसर फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसात अज्ञात दुचाकीस्वार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अज्ञात दुचाकीस्वाराचा शोध घेण्याचे आव्हान बांदा पोलिसांसमोर आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!