ग्रामस्थांच्या सहकार्याने त्रिंबक गावात साजरा झाला वृक्षारोपण महोत्सव
आचरा : त्रिंबक गावाच्या एकीतून झालेले ओढ्याचे पुनर्जीवन ही कौतुकास्पद गोष्ट असून गावाची एकी अशीच कायम ठेवा.यातुनच भविष्यात त्रिंबक गावासाठी विधायक कामे केली जावू शकतात असे मत मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी त्रिंबक येथे केले.त्रिंबक गाव हरीत गाव व्हावे
पर्यावरण संवर्धन व्हावे,वृक्ष वाढ झाली तर मनुष्य वस्ती मध्ये वाढलेला वन्य प्राण्यांचा उपद्रव कमी व्हावा या उद्देशाने जागृत त्रिंबक गृप आणि ग्रामपंचायत त्रिंबक यांच्या सहकार्याने त्रिंबक गावात विविध प्रकारच्या तीनशे झाडांची लागवड करण्यात आली.याचा शुभारंभ मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या हस्ते रामेश्वर मंदिर परीसरात झाला.यावेळी रामेश्वर मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी त्यांच्या सोबत
गटविकास अधिकारी आत्मज मोरे, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, पंचायत समिती कृषी अधिकारी संजय गोसावी सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशिष बागवे, चार्टर्ड अकाउंटन संतोष त्रिंबककर, अरविंद कदम,जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य सुचिता घाडी , तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपक्रमशिल शेतकरी विश्वास शेंडगे , सुरेंद्र सकपाळ, मेहंदळे सर, दत्ता पवार, ग्रामविकास अधिकारी माधुरी कामतेकर,कृषी विभागाचे सुशीलकुमार शिंदे तसेच शिक्षक, अंगणवाडी सेविका,आशास्वयंसेविका यांसह बहुसंख्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांनी ज्यावेळी नागरिक सामाजिक भावनेतून गावासाठी कार्य करत असतात तेव्हा प्रशासकीय अधिकारी यांनी सहकार्य करणे आवश्यक असते.किंबहूना तेकरणे गरजेचे असते असे मत यावेळी व्यक्त केले.यावेळी त्रिंबक गावाची मागणी लक्षात घेऊन त्यांनी या गावासाठी कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी यांची नेमणूक केल्याचे जाहीर केले.तसेच त्यांनी सीडबाॅल सरपंच त्रिंबककर यांच्या कडे सुपूर्द केले.तर तालुका कृषी अधिकारी गुरव यांनी त्रिंबक गाव आदर्श गाव साठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळीमान्यवरांच्या हस्ते वड,पिंपळ,सुरंगी बेल,बदाम, कडूलिंब यासारखी बहुगुणी तीनशे वृक्षांची लागवड त्रिंबक गावातील मंदिर, शाळा, वाचनालय, स्मशानभूमीआदी परीसरात वृक्षारोपण केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मेहंदळे , प्रास्ताविक दत्ता पवार यांनी तर आभार ग्रामविकास अधिकारी माधुरी कामतेकर यांनी केले.