कणकवली : तालुक्यातील हरकुळ बुद्रुक-कसालकरवाडी येथील सौ.मनिषा मंगेश परब(३४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मनिषा यांना मधुमेहाचा त्रास होता. रविवारी दिसभर त्यांना काहीसे अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्यांना उपचारासाठी कणकवली येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मनिषा यांचे निधन झाल्याचे सांगितले. याबाबतची माहिती मनिषा यांचे दिर नारायण परब यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली.
मनिषा यांच्या निधनाची माहिती समजताच त्यांच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवाराने येथील उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतली. येथील एका खाजगी नेत्र तज्ञ यांच्या रूग्णालयात परिचारिका म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांची अनेकांशी नाळ जोडली होती. मनिषा यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासरे, दिर असा परिवार आहे.