11.1 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

एनडीआरएफ (NDRF) च्या टीम कडून खारेपाटण येथे देण्यात आले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

दोन मुख्य टीम अधिकाऱ्यांसह २६ जवानांचा समावेश

खारेपाटण :एनडीआरएफ (NDRF) च्या टीम कडून खारेपाटण येथे आपत्ती निवारण /व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले. दि.11जुलै रोजी खारेपाटण हायस्कुल येथील सभागृहात NDRF च्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आपत्ती निवारणा विषयी उपस्थित सर्वाना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित 26 NDRFच्या जवानांच्या मदतीने कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यावर त्याला कसे तोंड द्यावे अर्थात त्या आपत्ती तुन सुखरूप बाहेर कसे पडता येईल या बाबतचे प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली.
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्थानिक नागरिकांनाच प्रथम सामारे जावे लागते. अशावेळी स्थानिक नागरिकांना योग्य प्रशिक्षण देऊन संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी हे आपत्ती निवारण प्रशिक्षण हे अत्यंत मोलाचे आहे.त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलातर्फे प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून जागृती करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
एखादी आपत्ती किंवा दुर्घटनेची माहिती एनडीआरएफसारख्या विशेष दलांना मिळून ते त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत बराच वेळ जातो. या काळात दुर्घटनाग्रस्त व्यक्तींना स्थानिक नागरिकच तातडीची मदत करू शकतात. यासाठी हे आपत्ती निवारण प्रशिक्षण महत्वाचे ठरते.
यामध्ये पुरात अडकलेल्या व्यक्तींना कसे बाहेर काढता येते, तसेच मातीच्या ढीगाऱ्या खाली असलेल्या लोकांचे बचाव कार्य कसे केले जाते, आग लागण्याच्या दुर्घटना घडतात त्यावेळी आग विझवण्यासाठी तसेच आगीतून अडकलेल्या लोकांचे बचावकार्य कश्यापद्धतीने केले जाते,कृत्रिम श्वास देणे, रक्तस्त्राव थांबवणे अशी सर्व कामे कशी केली जातात या सर्व गोष्टी ची माहिती खारेपाटण येथील स्थानिक ग्रामस्थ,
NCC विद्यार्थी, NSS विद्यार्थी, खारेपाटण ग्रामपंचायत ची आपत्ती व्यवस्थापन समिती, खारेपाटण व्यापारी वर्ग या सर्वांनाच आपत्ती निवारण ची प्रात्यक्षिकंसह बचाव कार्याची माहिती देण्यात आली. तसेच NDRF च्या मुख्य टीम च्या अधिकाऱ्यांसमवेत उपस्थित सर्व 26 जवानांनी खारेपाटण येथील पुरपरिस्थितीचा प्रत्यक्ष पुराचे पाणी ज्या ज्या ठिकाणी येते त्या त्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला व उपस्थित ग्रामस्थ, व्यापारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांना एनडीआरएफ’च्या पथकाने महापुराच्या कालावधीत करावयाच्या रेस्क्यू पद्धती, बोटीतून करायचे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ची माहिती व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.पुराच्या वेळी आवश्यक असलेली बचाव कार्याची प्रत्यक्षिके करून दाखवली. व लोकांना आपत्ती च्या वेळी कसे सुखरूप पणे बाहेर पडायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले.टीम NDRF च्या मुख्य प्रमोद राय कमांडर NDRF टीम व रविंदर NDRF टीम प्रमुख अधिकाऱ्यांसह 26 जवानांची टीम खारेपाटण मध्ये येऊन त्यांनी आपत्ती निवारणसाठी केलेल्या मार्गदर्शना मुळे सर्वच खारेपाटण ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होतं आहे.या प्रशिक्षण वेळी नायब तहसीलदार-मंगेश यादव ,महेश शेडगे-पोउपनिरीक्षक (पीएसआय)कणकवली पोलीस ठाणे, सर्कल ऑफिसर -बोवलेकर मॅडम तलाठी- जनवार मॅडम, ग्राम विस्तार अधिकारी -वेंगुर्लेकर, सरपंच -प्राची इस्वलकर,उपसरपंच-महेंद्र गुरव,सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी, खारेपाटण हायस्कूलचे चेअरमन लोकरे,हायस्कूलचे पर्यवेक्षक- राऊत सर शिक्षक वर्ग, NCC विभागाचे प्रमुख – कापसे सर, NSS विभागाचे -सय्यद सर व सर्व विद्यार्थी तसेच खारेपाटण ग्रामस्थ व सर्व व्यापारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!