3.9 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

….अन् सर्वांचीच उडाली तारांबळ

कणकवली : दिनांक १२ जुलै वेळ सकाळी ११ ची. कासरल पोस्ट ऑफिसचे कुलूप उघडून कर्मचारी आत बोलत असतानाच एक वेडसर महिला ऑफिसमध्ये आली आणि तिने काही कळण्या आधीच कुलुपला असलेली चावी काढून घेतली. लागलीच पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्याने चावी काढून घेण्याचा प्रयत्न करताच त्या महिलेने चावी सरळ अंतर्वस्त्रात लपवून एसटी त बसून कणकवली बस स्थानकाच्या दिशेने कूच केले. हतबल झालेले पोस्ट ऑफिसचे कर्मचाऱ्यानेही त्या महिले मागोमाग एसटी स्टँड गाठले. एसटी बस स्थानकात ती महिला उतरताच तिला बसवून ठेवत कणकवली पोलिसांना कळवण्यात आले. महिला पोलिसांसह पीएसआय राजकुमार मुंढे यांनी एसटी स्टँड वर जात त्या महिलेकडे चौकशी केली. मात्र त्या महिलेने आपल्याकडे चावी नसल्याचा कांगावा करत ताकास तूर लागू दिली नाही. अखेर त्या महिलेला पोलीस गाडीतून कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तरीही तिने आपल्याकडे चावी नसल्याचे ती महिला सांगत होती. अखेर महिला पोलिसांनी त्या महिलेची अंगझडती घेताच तिने अंतर्वस्त्रात लपवलेली चावी सापडून आली. चावी सापडताच पोस्ट कर्मचाऱ्याने सुटकेचा निःश्वास सोडला. कणकवली पोलिसांनी माणुसकी धर्म दाखवत त्या महिलेला कळसुली येथे तिच्या माहेरी नेऊन सोडले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!