2.5 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा वाढदिवस होणार विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा!

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा युवानेते श्री.संदेशभाई पारकर यांचा 14 जुलै रोजी होणारा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मोठ्या उत्साहात विविध सामाजिक, कला क्रीडा, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रमांनी 12 ते 14 जुलै 2024 दरम्यान कणकवली, देवगड, वैभववाडी या तीनही तालुक्यांत साजरा करण्यात येणार आहे. या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दिनांक 12 जुलै देवगड तालुक्यातील 10वी आणि 12वी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सकाळी 10.30 वाजता,स्वामी समर्थ मंगल कार्यालय, जामसांडे होणार आहे.

शनिवार दिनांक 13 जुलै

वैभववाडी तालुक्यात

तालुक्यातील 10 वी आणि 12वी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सकाळी 10.30 वाजता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, एस टी स्टँड शेजारी होणार आहे.

रविवार दि.14 जुलै कणकवली तालुक्यात भगवती मंगल कार्यालय, कणकवली शहर सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कै.सुबोध टिकले स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर, सकाळी 10 ते 11 गुणवंत विद्यार्थी सत्कार, सकाळी 11 ते 12 शंभर टक्के निकाल देणाऱ्या शिक्षण संस्थांचा सन्मान, दुपारी 12 ते 1 शिवसैनिकांचा सत्कार आणि छत्री वाटप,दुपारी 1 वाजता केक कापणे, व शुभेच्छा वर्षाव,या वाढदिवस सोहळ्यास शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कअरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, उपनेते आमदार राजन साळवी, उपनेते गौरीशंकर खोत, उपनेत्या महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक श्री.भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, विधानसभा प्रमुख सतिश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, महिला जिल्हाप्रमुख सौ. निलम सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महाविकास आघाडी नेते, जिल्ह्यातील प्रमुख सन्माननीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

तरी सिंधुदुर्ग जिल्हातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महविकास आघाडीच्या सर्व तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, सर्व सेलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि संदेश पारकर प्रेमींनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन निलम पालव, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, रुपेश नार्वेकर, मंगेश लोके, मिलिंद साटम, जयेश नर यांनी केले आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!