28.1 C
New York
Monday, July 7, 2025

Buy now

शिवडाव धरणाच्या पाइप दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी

कणकवली : तालुक्यातील शिवडाव, पटेलवाडी येथील लघू पाटबंधारे धरण प्रकल्पाच्या कालव्यांच्या पाइप दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यानंतर कालव्यांच्या पाइप दुरुस्तीचे हे काम लवकर पूर्ण झाल्यास गेली दोन वर्षे उन्हाळी शेतीसाठी बंद असलेले पाणी यावर्षी उपलब्ध होणार आहे.

शिवडाव, पटेलवाडी येथे असलेले हे धरण गावातील शेतीसाठी वरदान ठरले आहे. धरण प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या अशा दोन्ही कालव्यांची लांबी सुमारे ७ किलोमीटरपर्यंत आहे. मात्र, कालव्यांच्या पाइपलाइनला मोठ्या प्रमाणावर असलेली गळती व व्हॉल्व्ह नादुरुस्त असल्याने गेली दोन वर्षे उन्हाळी शेतीसाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. मागील वर्षी या कामासाठी राज्य शासनाकडून सुमारे दीड कोटीचा निधी मंजूर झाला असून, कालव्यांच्या दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले आहे. अद्याप यातील बहुतांश काम हे शिल्लक आहे.

उन्हाळी शेतीसाठी पाणी सोडण्यात येत नसल्याने धरण प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा शिल्लक होता. मात्र, पाणीटंचाई कालावधीमध्ये व कणकवली शहराला पाणीपुरवठा

करणाऱ्या गडनदीतील उद्भव विहिरीला पाणी कमी पडू लागल्याने शिवडाव धरणातून पाणी सोडण्यात आले होते. कणकवली शहराबरोबरच आजूबाजूच्या गावातील पिण्याच्या पाण्याची तहान पाणीटंचाई कालावधीमध्ये शिवडाव धरणामुळे भागवता आली होती. तरीही धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असल्याने यावर्षी लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहू लागले आहे.

दोन वर्षांपासून कालव्यातून पाणीपुरवठा बंद

शिवडाव गावामध्ये हा धरण प्रकल्प झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शेती केली जात होती.

दोन वर्षांपूर्वीपर्यंत गावात सुमारे ३५ एकरपर्यंत केवळ ऊस शेती होती. त्याव्यतिरिक्त इतर पिके व बागायतीला पाणी उपलब्ध होत असे.

मात्र, कालवे नादुरुस्त झाल्याने पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने दोन वर्षापासून कालव्यातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!