सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी अमोल राजाराम चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी त्यांनी पदभार स्वीकारला. सावंतवाडी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची ठाणे ग्रामीण येथे बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या सावंतवाडी येथील त्यांच्या जागी तातडीने मुंबई अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अमोल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.