कणकवली : तालुक्याला रविवारी पावसाने झोडपले असून तालुक्यातील कासार्डे पोलीस दुरक्षेत्राला पाण्याचा वेढा आला आहे. मुंबई – गोवा महामार्गावर कासार्डे येथे असलेले पोलीस दूरक्षेत्रला देखील मुसळधार पावसाचा फटका बसला असून दूरक्षेत्राला पाण्याचा वेढा आला होता. मुंबई – गोवा महामार्गाचे काम केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी दरवर्षी पाण्याचा विळखा पहायला मिळत आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.