22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

प्रल्हाद साटविलकर ची गळफास लावून घेत आत्महत्या

कणकवली : कणकवली शहरातील प्रल्हाद महानंद साटविलकर (वय ४४ वर्षे रा. समर्थनगर, साईपुजा अपार्टमेंट) याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. प्रल्हाद हे एका खाजगी संस्थेत अकाउंटंट पदावर कार्यरत होते. काल शुक्रवार दि ५ जुलै रोजी प्रल्हाद जेवल्यानंतर आपल्या खोलीत झोपायला गेला. ६ जुलै रोजी सकाळी नेहमीच्या वेळेत प्रल्हाद खोलीबाहेर न आल्यामुळे त्याच्या आईने दरवाजा उघडला असता प्रल्हाद चा मृतदेह छताच्या फॅन ला लटकलेल्या अवस्थेत होता. याबाबतची खबर मयत प्रल्हाद ची आई सुनीता हिने कणकवली पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास हवालदार विनोद सुपल करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!