5 C
New York
Friday, March 13, 2026

Buy now

कलमठ मधील विवाहिता बेपता

कणकवली : कलमठ गावातील स्वरा संदीप कांबळे (वय 28) ही विवाहित महिला 3 जुलै रोजी सकाळी सव्वा दहा वाजल्यापासून बेपत्ता असल्याची फिर्याद तिचा पती संदीप कांबळे याने कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. स्वरा ही कलमठ येथे पती संदीप, 2 मुली आणि सासू सह राहत असे. मात्र 3 जुलै रोजी घरात कोणालाही काहीही न सांगता ती घरातून निघून गेली. स्वरा चा रंग गोरा असून उंची 5 फूट 2 इंच आहे. केस काळे लांब असून गळ्यात लहान मंगळसूत्र, कानात सोन्याचे रिंग आहेत. शेजारी तसेच नातेवाईकांकडे शोध घेऊनही स्वरा सापडली नसल्याने संदीप यानी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!