22.5 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

…..तरी, पुढचे आमदार केसरकरच ; अशोक दळवी

सावंतवाडी : राजन तेली यांनी कितीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी येणाऱ्या निवडणुकीत दीपक केसरकर हेच विधानसभेचे उमेदवार असतील आणि तेच आमदार म्हणून निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे त्यांनी वायफळ बडबड बंद करावी असा पलटवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी केला.दरम्यान श्री. तेली हे सावंतवाडीसाठी उपरे आहेत. यापूर्वी त्यांना येथील जनतेने २ वेळा त्यांची जागा दाखवून दिली होती. त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे प्रयत्न निश्चितच निष्फळ ठरतील. त्यामुळे त्यांनी केसरकरांवर आरोपासाठी आरोप करण्यापेक्षा एकत्र बसून चर्चा करावी, असाही सल्ला त्यांनी दिला आहे. राजन तेली यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी श्री. दळवी बोलत होते. यावेळी त्यांनी तेलींवर टीका केली ते म्हणाले, काही झाले तरी यापुढे पुन्हा दीपक केसरकरच सावंतवाडी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येणार आहेत. ही काळया दगडावरची रेघ आहे. परंतु असे असताना केवळ सवंग प्रसिद्धीसाठी श्री तेली हे केसरकर यांच्यावर आरोप करत आहेत. मात्र येथील जनता त्याच्या आरोपाला बळी पडणार नाही. आमदार केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी मतदारसंघाचा विकास झाला आहे. त्यांनी जर्मनीमध्ये येथील मुलांना नोकऱ्या देण्याचे मान्य केले आहे.एवढेच नव्हे तर काही दिवसात त्या नोकऱ्या त्या ठिकाणी मिळणार आहेत. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील काही प्रश्न त्यांनी सोडवले असून अन्य काही प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु केवळ विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा त्यांच्यासोबत एकत्र बसून समस्या सुटण्यासाठी योग्य तो प्रयत्न करावा. भाजप आणि शिवसेनेची देशात आणि राज्यात महायुती आहे. त्यामुळे तेली करत असलेले वक्तव्य महायुतीचा पदाधिकारी म्हणून आहे का? असा सवाल करून तसे असल्यास एका पदाधिकाऱ्यांला अशा प्रकारे टीका करणे त्यांना शोभते का? असा उलट प्रश्न त्यानी केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!