28.3 C
New York
Thursday, July 25, 2024

Buy now

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- २०२५ चे रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी आयोजन

कणकवली : विमानाने ईस्त्रो सहलीसह, गोवा सायन्स सेंटर भेट आणि अडीच लाखांची रोख पारितोषिके असलेल्या युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेचे हे ८ वे वर्ष असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. इयत्ता २ री, ३ री, ४ थी, ६ वी आणि ७ वी साठी ही परीक्षा मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातून होणार आहे. प्रत्येक इयत्तेतील पाहिल्या ५० अशा २५० गुणवंत विद्यार्थ्यांना अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके , सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच ४ थी, ६ वी व ७ वी या प्रत्येक इयत्तेतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) या संस्थेला व २ री, ३री, च्या टॉप फाईव विद्यार्थ्याना गोवा येथील सायन्स सेंटरला भेटीसाठी घेऊन जाण्यात येणार आहे.

याशिवाय ११२ ते १३० गुण असलेल्यांना ब्रांझ मेडल, १३२ ते १५० गुण असलेल्यांना सिल्वर मेडल आणि १५२ पेक्षा जास्त गुण असलेल्यांना गोल्ड मेडल बक्षीस वितरण समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाणार आहे. त्याच प्रमाणे निकाला दिवशी पालक / शिक्षक / विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे. या परीक्षेचे मुख्य परीक्षा केंद्र – कणकवली कॉलेज, कणकवली असून इतर परीक्षा केंद्र – फोंडा हायस्कूल, जी प शाळा खारेपाटण न १, वामनराव महाडिक विद्यालय तरेळे, शिरगाव हायस्कूल, शाळा जामसंडे न १, देवगड, शाळा कुणकेश्वर न १, देवगड, पडेल हायस्कूल, पडेल, रामगड हायस्कूल, आचरा हायस्कूल टोपीवाला हायस्कूल, मालवण, वराडकर हायस्कूल कट्टा, कुडाळ हायस्कूल,कुडाळ, न्यू इंग्लिश स्कूल कसाल, वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव, RPD हायस्कूल सावंतवाडी, कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी, खेमाराज मेमो हायस्कूल बांदा, शाळा मळेवाड न. 1, आंबोली सैनिक स्कूल, कलबिस्त हायस्कूल, मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव, सैनिक स्कूल,आंबोली, शाळा माडखोल न १, न्यू इंग्लिश स्कूल दोडामार्ग, न्यू इंग्लिश स्कूल भेडशी, वेंगुर्ला हायस्कूल, अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी अशी आहेत.

यावर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी , कोल्हापुर,पालघर व ठाणे जिल्हात आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा संजना संदेश सावंत (माजी जि. प. अध्यक्ष) यांनी केले असून अधिक माहितीसाठी STS परीक्षा प्रमुख सुशांत सुभाष मर्गज (९४२०२०६३२६), प्रमोद पवार ९४२१२६६७५१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!