22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

कारभार सुधारा, अन्यथा आमच्या स्टाईलने सुधारू… 

ठाकरे शिवसेना आक्रमक ; कुडाळ एसटी प्रशासनाला दिला इशारा…

कुडाळ : येथील एसटी डेपो मध्ये दिवसा ढवळ्या अनागोंदी कारभार सुरू आहे. या अनागोंदी कारभारामुळे प्रवाशी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे १०जुलै पर्यंत तुमचा कारभार सुधारा, अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने सुधारू, असा इशारा शिवसेना एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक आणि शिवसेनेचे अतुल बंगे यांनी दिला.

शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज कुडाळ डेपो मॅनेजर संदीप पाटील यांची भेट घेऊन कुडाळ डेपोच्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचला आणि जाब विचारला. कुडाळ एसटी डेपोमध्ये कारभार सुधारा यासाठी आमदार वैभव नाईक यांनी अनेक वेळा प्रयत्न केले. तसेच कुडाळ एसटी डेपोमध्ये प्रवांशांचे हाल होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले असताना यात काहीच सुधारणा नसुन कुडाळ नवीन स्टॅण्ड वरुन जशा पहिल्या बसेस सुटत होत्या तसेच सोडण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे , कुडाळ तालुका शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, कुडाळ तालुका शिवसेना युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, सचिन काळप, अष्पाक कुडाळकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सुशील चिंदरकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ शिवसेना शहर उपशहरप्रमुख गुरु गडकर, कुडाळ शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट, शैलैश काळप, संदीप महाडेश्वर, अमित राणे व नविन बसस्टँडला असणारे रीक्षाचालक आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!