7.1 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा २०२४-२५ वेळापत्रक जाहीर

कणकवली | मयुर ठाकूर : राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित अशी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा सहावी व नववीकरता इंग्रजी व मराठी माध्यमातून लेखी, प्रात्यक्षिक प्रकल्प व मुलाखत या चार टप्प्यात घेतली जाते. ही परीक्षा बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे १९८१ पासून सुरु करण्यात आली. गेली ४३ वर्षे ३००० पेक्षा जास्त शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. शालेय स्तरावर महत्त्वाची अशी विज्ञानावर आधारित ही परीक्षा असून चारही टप्पे यशस्वी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत, कांस्यपदक, शिष्यवृत्ती व सन्मानपत्र देऊन शास्त्रज्ञांच्या हस्ते गौरवण्यात येते. तसेच होमी भाभा विज्ञान केंद्र मानखुर्द येथे दोन दिवस शिबिरात सहभाग घेता येतो.

मुलांनी नुसती परीक्षार्थी न बनता त्यांची प्रयोगशीलता निरीक्षण शक्ती, आकलन शक्ती, चौकस बुद्धी वाढावी, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा ही या स्पर्धेचे उद्दिष्ट आहेत. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता सहावी व नववी सर्व माध्यम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. शाळेमार्फत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख १ ते ३१ जुलै २०२४, वैयक्तिक ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची तारीख १ ते १६ ऑगस्ट २०२४ आहे.

१०० गुणांची लेखी परीक्षा नोव्हेंबरच्या तिसऱ्या शनिवारी होईल. लेखी परीक्षेतून मेरिटनुसार साडेसात टक्के विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवडण्यात येतील प्रात्यक्षिक परीक्षा इयत्ता सहावी करिता ५ जानेवारी व नववी करता १९ जानेवारी विभागवार केंद्रावर होईल. प्रात्यक्षिक परीक्षेतून दहा टक्के विद्यार्थी प्रकल्प व मुलाखतीकरिता निवडण्यात येतील. प्रकल्प मुलाखत १६ मार्च २०२५ रोजी मुंबई येथे होईल.

इयत्ता सहावी व नववीतील इच्छुक विद्यार्थ्यांनी शाळेमार्फत या परीक्षे करता नावनोंदणी करावी असे आवाहन जिल्हा कॉर्डिनेटर सौ. सुषमा केणी यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता ९२८४०३५३२६ या क्रमांकावर किंवा www.msta.in या संकेतस्थळावर संपर्क करावा

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!