कुडाळ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी पात्र लाभार्थी यांना उत्पन्न दाखला व अधिवास दाखले आवश्यक आहेत. त्यासाठी शासन निर्णयान्वये सूचना निर्गमित करणेत आलेल्या आहेत. त्यामुळे हे दाखले मिळण्यासाठी कुडाळ तालुक्यात मंडळ निहाय विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळचे तहसीलदार विरसिंग वसावे यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिला लाभार्थी यांना दिनांक ०१/०७/२०२४ ते १५/०७/२०२४ या कालावधीत अर्ज करणेसाठी मुदत दिलेली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी यांना विहित मुदतीत अर्ज करून लाभ घेण्यासाठी दिले जाणारे उत्पन्न दाखला व अधिवास दाखले विशेष मोहिम स्वरुपात युद्धपातळीवर देणे आवश्यक आहे. त्याकरीता कुडाळ तालुक्यात मंडळ निहाय शिबीर आयोजित करून विहित दाखले देणेकामी दि. 4 जुलै रोजी गोठोस आणि कसाल, 5 जुलै रोजी माणगाव व घाटगे, 6 जुलै रोजी माड्याचीवाडी आणि नेरूर तर्फ हवेली येथे शिबीर आयोजित करणेत येत आहे.
तरी सदर शिबिरांचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात व्यापक प्रसिद्धी देणेत यावी व नागरीकांना विहित मुदतीत दाखले प्राप्त होतील याची दक्षता घेणेत यावी.