22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

रोटरी क्लब कणकवली अध्यक्षपदी प्रा.जगदीश राणे

सचिवपदी अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, खजिनदारपदी डॉ.अमेय मराठे

कणकवली | मयुर ठाकूर : रोटरी क्लब ऑफ कणकवली मार्फत येत्या वर्षभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष प्रा. जगदीश राणे यांनी दिली. तसेच रोटरी क्लब ऑफ कणकवलीचा पदग्रहण सोहळा शुक्रवार ५ जुलैला सायं ६ वाजता भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ कणकवलीची नूतन कार्यकारिणी व पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. यात अध्यक्ष प्रा. जगदीश राणे, उपाध्यक्ष प्रा. सुप्रिया नलावडे, सचिव ॲड. राजेंद्र रावराणे तर खजिनदार डॉ अमेय मराठे यांची निवड झाल्याची माहिती नूतन अध्यक्ष प्रा. राणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. प्रा जगदीश राणे यांनी यावेळी रोटरीच्या वतीने येत्या वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या माता बाल आरोग्य तपासणी, जल व्यवस्थापन, वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण, महिला व जेष्ठ नागरिकासाठी शिबिरे, गुंतवणूक साक्षरता अभियान, रक्तदान, अवयवदान, पांढरी काठी व जयपूर फूट अभियान, विद्यार्थी व शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप, सार्वजनिक स्वच्छता, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम, पाककला स्पर्धा, यशस्वी उद्योजकांचा सत्कार, स्वयंचलित शुद्ध पेयजल यंत्रणा, इ नियोजित विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!