22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

दोन तालुके म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा नव्हे हे आ. नितेश राणेंनी लक्षात घ्यावे – संदेश पारकर

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : जिह्यातील प्रत्येक तालुक्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र जिल्ह्यात आठ तालुक्यांपैकी केवळ कणकवली आणि सावंतवाडी तालुक्यात या दोनच ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. दोन तालुके म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा नव्हे हे नितेश राणेंनी लक्षात घ्यावे. कुडाळ तालुक्यातील आपला दवाखाना पूर्णपणे बंद स्थितीत आहे. आज कुडाळ येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पॉट पंचनामा केला असता याठिकाणी आपला दवाखान्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. मात्र दवाखान्याला कुलूप लावलेले असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपला दवाखान्यांचा प्रश्न अधिवेशनात मांडल्याने केवळ दोनच ठिकाणी हे दवाखाने सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. आ. वैभव नाईक यांनी मांडलेली वस्तुस्थिती खरी असून आमदार नितेश राणे उघडे पडले आहेत. त्याचबरोबर कणकवली येथील आपला दवाखान्यातुन वर्षभरात उपचार घेतलेल्या रुग्णांची जाहीर केलेली आकडेवारी हि केवळ २१३८ आहे. या आकडेवाडीनुसार दिवसाला २ ते ५ रुग्णांनीचा उपचार घेतल्याचे स्पष्ट होते.आणि त्यातही प्रत्यक्षात किती रुग्णांना आवश्यक असलेले उपचार मिळाले हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने गाजावाजा केलेली हि योजना राबविण्यात सरकार फेल ठरल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!