28.3 C
New York
Thursday, July 25, 2024

Buy now

आमदार नितेश राणे यांनी जल जीवन चा विषय सभागृहात मांडताच मंत्री पाटील यांनी लावली संयुक्त बैठक

मंत्री गुलाबराव पाटील हे कडवट शिवसैनिक जल जीवन मिशन यशस्वी करतील ; व्यक्त केला विश्वास

ब्युरो न्युज : जल जीवन मिशन ची कामे वेळेत आणि दर्जेदार होण्यासाठी संबधित खात्याच्या मंत्र्यांनी वस्तुस्थिती जाणून घेवून अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात.त्यासाठी मंत्री महोदयांनी प्रत्येक जिल्हात ग्राऊंडवर उतरून वस्तुस्थिती चा आढावा घ्यावा. जल जीवन च्या एक एका ठेकेदाराकडे १८ ते २० कामे आहेत. त्या कामांचा दर्जा ते कसा राखणार यावर निर्णय झाला पाहिजे.अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत जल जीवन मिशन च्या लक्षवेधी वर बोलताना केली. दरम्यान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार नितेश राणे यांची सूचना योग्य आहे.या बाबत प्रत्येक जील्हातील अधिकारी आणि आमदार यांची संयुक्त बैठक तातडीने घेतो आणि संपूर्ण कामांचा आढावा घेतो. असे सभागृहात आश्वासन दिले.
आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या सभागृहात जल जीवन मिशन वरील लक्षवेधी दरम्यान बोलताना म्हणाले,जल जीवन मिशन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरगामी विचार करून देशात पाणी देण्यासाठी राबविकेली महत्वकांक्षी योजना आहे.अशा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी जलद गतीने काम होणे गरजेचे आहे.या खात्याचे मंत्री गुलाबराव पाटील हे कडवट शिवसैनिक आहे.ते प्रामाणिकपणे ही योजना राबवत आहे. त्यांच्या कडे एखाद्या विषयाचा तुकडा पाडण्याची हिंमत आहे.त्यामुळे ते हा विषय गांभीर्याने ते हाताळतील. एक ठेकेदार जल जीवन ची 18 ते 20 कामे करतो. त्या ठेकेदाराची तेवढी कामे करण्याची कॅपॅसिटी आहे काय हे सुद्धा जाणून घ्यावे. आणि वेळेत कमे व्हावीत यासाठी मंत्री महोदयांनी आढावा घ्यावा.अशी चर्चा आमदार नितेश राणे यांनी सभागृहात केली. याविषयीच्या लक्षवेधीवर आमदार केचे,आमदार योगेश कदम, आम.धीरज देशमुख, आम.यशोमती ठाकूर,यांच्या सह अनेक आमदारांनी चर्चा केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!