कणकवली | मयुर ठाकूर : कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली या प्रशालेमध्ये दि. २८ जून २०२४ रोजी दहावी- बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा के. आर दळवी (शालेय समिती चेअरमन) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
प्रशालेने याही वर्षी १००% निकालाची परंपरा कायम ठेवत यश संपादन केले. याप्रसंगी प्रमुख मान्यवरांमध्ये प्रकाश दळवी (कळसुली शिक्षण संघ मुंबई सल्लागार) जयवंत कुलकर्णी उर्फ भाई गुरुजी, नामदेव घाडीगावकर (स्कूल कमिटी व्हाईस चेअरमन) रजनीकांत सावंत (स्कूल कमिटी सदस्य ) शिवाजी गुरव (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) मुख्याध्यापक वगरे व्ही. व्ही., पर्यवेक्षक सावळ एस. के., शिवप्रसाद घाडीगावकर (शाळा व्यवस्थापन समिती), श्वेता दळवी, प्रियांका देसाई, शरयू सावंत, संजय सुतार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक वगरे व्ही. व्ही यांनी प्रास्ताविकात प्रशालेतील विविध उपक्रमाची माहीती दिली. यामध्ये इयत्ता आठवीसाठी नव्याने सुरू झालेला बहुविध कौशल्य अभ्यासक्रम आणि इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड यासारख्या नवीन उपक्रमांची माहिती प्रास्ताविकामध्ये मांडली.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम क्र.- कु. प्राची प्रमोद दळवी ९४. ६०%, द्वितीय क्र. कु. तन्वी संतोष राऊळ ९३.००%, तृतीय क्र. – कु. अजिंक्य संजय सुतार ९२. २०% तसेच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कला शाखा – प्रथम कु. संध्या अनंत गुरव ६३.१७%, द्वितीय – कु. अनुष्का रामचंद्र राणे ६२.८३%, तृतीय – कु. पियुष उत्तम कासले ६१.८३% . वाणिज्य शाखा – प्रथम कु. श्रावणी विजय घाडीगावकर ८५.३३%, द्वितीय – कु. किरण विजय गुरव ८०.५०%, तृतीय – कु. लविणा अंकुश कदम ७७.६७% या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा कळसुली शिक्षण संघ, मुंबई यांच्यावतीने वह्या, फोल्डर व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
जयवंत विष्णू कुलकर्णी उर्फ भाई गुरुजी, नामदेव घाडीगावकर, बापू खरात (पोलीस उपनिरीक्षक कणकवली), शिवाजी गुरव, शिवप्रसाद घाडीगावकर यांनी आर्थिक स्वरुपात बक्षीस देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. या कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा संस्थेच्या वतीने शंभर टक्के निकाल लावल्याबद्दल गुलाबपुष्प देऊन गौरव केला. त्याचप्रमाणे त्यांना जयवंत कुलकर्णी यांनी प्रोत्साहन स्वरूपात बक्षीस देऊ केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांमधून मनोगत व्यक्त करताना प्राची प्रमोद दळवी, तन्वी संतोष राऊळ यांनी यश संपादन करण्यास प्रोत्साहित करणाऱ्यां सर्वांचे मनापासून आभार मानले. यशाचे संपूर्ण श्रेय पालक आणि शिक्षकांना दिले. रजनीकांत सावंत, नामदेव घाडीगावकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख उपस्थितामध्ये भाषण करताना प्रकाश दळवी यांनी उज्ज्वल यश मिळवून गुणवत्तापूर्ण निकाल देणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक या सर्वांचे विशेष कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात के. आर. दळवी यांनी शेतकऱ्यांच्या आणि गरीब कष्टकऱ्यांच्या सामान्य मुलांनी मिळवलेल्या विलक्षण यशाबद्दल मुलांचे कौतुक केले. परिस्थितीचा बाऊ न करता सततच्या परिश्रमाने यश संपादन करता येते असा मौलिक सल्ला दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष पुरुषोत्तम सदाशिव दळवी, कार्याध्यक्ष सूर्यकांत राजाराम दळवी, सरचिटणीस – विजय पांडुरंग सावंत, सर्व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा संदेश पाठवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभाराची धुरा प्रशालेतील शिक्षक आनंद सावंत यांनी सांभाळली. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.