3.8 C
New York
Thursday, December 4, 2025

Buy now

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा अनोखा उपक्रम | कोळपे पंचायत समिती मतदार संघातील ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : वैभववाडी तालुक्यातील कोळपे पंचायत समितीची उ.बा.ठा शिवसेनेची बैठक संपन्न झाली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेनेच्या माध्यमातून जेष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आला यावेळी त्यांना शाल व छत्री देत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आगामी निवडणुकीसाठी संघटनावाडी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रत आता महाविकास आघाडीचे 31 खासदार आले असून, आता महाराष्ट्रत महाविकास आघाडीची सत्ता येणार ही सत्यता आहे. आपण आपल्या दृष्टीने कणकवली विधानसभा मतदार संघामध्ये कोळपे पंचायत समिती मध्ये आपण जोमाने काम करणं महत्वाचे आहे. संघटना वाडी सर्वजण लागणारी मदत करतील अशी ग्वाही यावेळी शिवसैनिकांनी दिली.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,युवा सेना चिटणीस स्वप्नील धुरी, कणकवली उपतालुका प्रमुख तालुका गोट्या कोळसूळकर,गुलजार काझी,विभाग प्रमुख विलास पावसाकर, कोळपे सरपंच सुनील कांबळे, मांगावली शाखा प्रमुख सचीन आयरे, बबन धुरी,गोपाळ पाटील, हमीद राऊत, इस्माईल लांजेकर, बादशाह लांजेकर, युसूफ नंदकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!