युती धर्म पाळून कोणावर बोलणार नाही ; येणाऱ्या काळात राणेंच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास केला जाईल
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : राजन तेलींना सावंतवाडीतील जनतेने दोन वेळा नाकारले आहे. त्यामुळे मी पराभव झालेल्या लोकांवर बोलणार नाही, त्यांची काय मागणी असेल तर त्यांनी वरिष्ठांकडे करावी शेवटी तो त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे, असा पलटवार मंत्री दीपक केसरकर यांनी केला. दरम्यान आज सर्वजण आम्ही महायुती म्हणून राज्यात काम करतो. त्यामुळे मी युतीचा धर्म पाळून त्यांच्यावर एकही शब्द बोलणार नाही, असेही केसरकर म्हणाले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कसा होतो त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोण काय बोलतो यावर मी लक्ष देणार नाही. राणेंच्या माध्यमातून अधिकाधिक विकास येणाऱ्या काळात कसा होईल मोठ – मोठे उद्योग कसे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मी कोणावर लक्ष न देता महायुती कशी मजबूत राहिल यासाठी माझे प्रयत्न असणार आहे, असे ही केसरकर यावेळी बोलताना म्हणाले.