22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

महापुरुषांची विटंबना होऊ नये म्हणून कडक कायदा करा | आमदार नितेश राणे यांची विधानसभेत मागणी

कणकवली | मयुर ठाकूर : महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणे त्यांच्याबद्दल वाईट स्टेटस ठेवणे असे प्रकार महाराष्ट्र राज्यात सातत्याने वाढू लागले आहेत. छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्वच महापुरुषांची कोणत्याही व्यक्तीने विटंबना करू नये. आपले आदर्श असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याकडे वाकड्या नजरेने पहाणारे जिहादी विचाराचे जे लोक आहेत. त्यांना अद्दल घडावी यासाठी विटंबना करणाऱ्यांच्या विरोधात सरकारने कडक कायदा अमलात आणावा, अशी मागणी कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी आज अधिवेशनात केली.
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते काल रस्त्यावर उतरलेले होते.याला कारण हडपसरला अशी घटना घडली, जिथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर एका जिहादी विचाराच्या तरुणाने जाऊन दगडफेक केली. तो पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे राज्यात जागो – जागी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला हिंदुत्ववादी विचाराचे तरुण रस्त्यावर उतरले.संतापले होते. कारण महापुरुषांच्या पुतळ्यांचे विटंबना करण्याचे प्रकार महाराष्ट्र राज्यामध्ये वाढले आहेत. महापुरुषांच्या विरोधात स्टेटस ठेवण्याचे स्टेटस ठेवण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. या सर्वाला कायद्याने आळा घालता येईल अशी मागणी आमदार निदर्शने यांनी विधानसभेत मांडली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!