22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

बिर्याणी खायला गेला अन् मोबाइल गमावून बसला

कणकवलीतील घटना ; पोलिस ठाण्यात कैफियत

कणकवली : सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जरा चटपटीत काही तरी खाण्याचा मोह खवय्यांना होत आहे. असाच एक बिर्याणी खवय्या कणकवली शहरातील एका हॉटेलमध्ये बिर्याणीवर ताव मारायला गेला; पण बिर्याणी खाण्याच्या नादात ४० हजारांचा मोबाइल गमावून बसण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. मोबाइल गायब झाल्याने हडबडलेल्या अवस्थेत भर पावसात भिजत त्याने गुरुवारी कणकवली पोलिस ठाणे गाठले, तसेच आपली कैफियत पोलिसांकडे मांडली.

कणकवली शहरातील डीपी रोडवर असलेल्या एका तंदुरी कम बिर्याणी सेंटरमध्ये हा खवय्या गुरुवारी सायंकाळी बिर्याणी खायला गेला. बिर्याणी खाण्याच्या नादात त्याने गेल्या महिन्यात ४० हजार रुपयांना खरेदी केलेला आपला मोबाइल तेथील टेबलवर ठेवला होता. पण बिर्याणी खाऊन होईपर्यंत त्याचा मोबाइल मात्र गायब झाला होता. इकडेतिकडे शोधाशोध करूनही मोबाइल सापडला नाही. त्यामुळे बाहेर धो धो पाऊस पडत असतानाही त्याला घाम फुटला. तशाच अवस्थेत त्याने कणकवली पोलिस ठाणे गाठले, तसेच मोबाइलबाबत घडलेली घटना पोलिसांना सांगितली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू होती.,

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!