जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची “खोड” चित्रफितीतील कल्पकता समाजासाठी दिशादर्शक
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही” ही मालवणी म्हण व त्यावर आधारित “खोड” या व्यसनाधीनतेवर बनविलेल्या चित्रफितीला चांगलीच दाद मिळाली. भावनिक व हृदयस्पर्शी कौटुंबिक असलेली व वास्तवतेचे दर्शन घडविणारी “खोड” नक्कीच समाजासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत सिंधुनगरी येथील पत्रकार भवनाच्या सभागृहात सात मिनिटांची ही चित्रफित प्रदर्शित झाली. एखादा गुन्हा घडला की त्यानंतर पोलीस कारवाई ही कायदेशीर पद्धत आहे. पण तो गुन्हा टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या कल्पकतेतून निर्माण झालेली ही चित्रफित सर्वच युवा पिढीसाठी व समाजासाठी मार्गदर्शक ठरणारी असल्यामुळे त्यांच्या या कल्पकतेचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले.
चित्रपट निर्माते सिंधुदुर्ग चे सुपुत्र साईनाथ जळवी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या कल्पकतेवर व मालवणी म्हणीचा आधार घेत व्यसनाधीनता टाळण्यासाठी तयार केलेल्या ” खोड” या चित्रफितीच्या शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत सिंधुनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर सभागृहात झाला. यावेळी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, निर्माते साईराज जळवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनोज जोशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, दै.तरुण भारत सिंधुदुर्ग चे संपादक शेखर सामंत, मानसोपचार तज्ञ डॉ.रुपेश धुरी आदींसह सिनेमातील कलाकार, नागरिक, पोलीस अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ही मालवणी म्हण व त्यावर आधारित “खोड” या व्यसनाधीनतेवर बनविलेल्या चित्रफितीला चांगलीच दाद मिळाली. एखादा गुन्हा घडला की त्यानंतर पोलीस कारवाई ही कायदेशीर पद्धत आहे. मात्र तो गुन्हा टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या कल्पकतेतून निर्माण झालेली ही चित्रफित सर्वच युवा पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. भावनिक व हृदयस्पर्शी कौटुंबिक असलेली व वास्तवतेचे दर्शन घडविणारी खोड नक्कीच समाजासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत सिंधू नगरी येथील पत्रकार भवनाच्या सभागृहात प्रदर्शित झाली. वाढते पर्यटन गोव्याच्या जवळचा प्रदेश यामुळे नसले पदार्थांचे पाऊल कौतुकास्पद आहे. व्यसनाधीनतेवर आधारित गुन्हे कमी करण्यासाठी खोड हे बनवलेली चित्रफित युवा पिढीसाठी मार्गदर्शक आहे. अत्यंत भावस्पर्शी कौटुंबिक व वास्तवतेचा वेध घेणारी ही सातच मिनिटाची ही चित्रफित पाहताना डोळ्यात पाणी येते. व अंगावर काटा ही उभा राहतो. जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हे मालवणी म्हण व त्या आधारावर व्यसनाधीनता व त्यानंतर झालेली त्या कुटुंबाची वाताहात, व्यसनाधीनतेचे वास्तव्य दाखविण्यात आले आहे. जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांनी केलेला अभिनय हृदयस्पर्शी वाटला! व भावी पिढीसाठी निश्चितच ही कलाकृती मार्गदर्शक असेल. म्हणूनच ही चित्रफित जिल्ह्यात सर्वत्र राज्यभर व देशभर प्रदर्शित व्हायला हवी अशी अपेक्षा अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.
दैनिक तरुण भारत चे सिंधुदुर्ग आवृत्ती संपादक ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांनी या जिल्ह्यातील जिल्ह्यातील व्यसनाधीनतेचे वास्तव्य व आपले अनुभव सांगताना जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी उचललेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर म्हणाले अध्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भावनातून समाजप्रबोधनासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकानी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजाला मार्गदर्शन करणार आहे जिल्ह्यातील युवा पिढीला चांगली दिशा देणार आहे. कुडाचे मानसोपचार तज्ञ डॉक्टर रुपेश धुरी यांनी कोणत्या वस्तूचे अथवा गोष्टीचे अतिरिक्त सेवन झाले किंवा त्याच्या आहारी गेलो की ते विष बनते! जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले पाणी असो ऑक्सिजन असो जर प्रमाणापेक्षा जास्त झाले तर त्याचेही विष ठरते. त्याच पद्धतीने वैद्यक शास्त्रामध्ये उपचारात वापरले जाणारे नशेली पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त वापरले तर त्याचेही विष तयार होऊन अंत होतो. याबाबत सुंदर मार्गदर्शन केले. व्यसनाधीनता सोडा असे मार्गदर्शन करून कोणी ती सोडत नाही तर त्या व्यक्तीची त्यासाठी मनापासून इच्छा असावी लागते असे ते म्हणाले. निर्माते साईनाथ जळवी यांनी आपण अनेक चित्रपट बनविले त्या आनंदापेक्षा या छोट्याशा चित्रफीत बनविण्याचा आनंद फार मोठा आहे. समाजासाठी ही चित्रफीत उपयोगी ठरणारी असल्यामुळे समाधान आहे असेही ते म्हणाले.
” खोड” हृदयस्पर्शी : वास्तवतेचे दर्शन!
” खोड” या सात मिनिटाच्या चित्रफितेमध्ये एक सर्वसामान्य कुटुंब दाखविले आहे. आई-वडील व बहिण- भाऊ! आपल्या मुलाचा हट्ट पुरवणारे आई वडील व सुरू असलेला सुखी संसार! मात्र मुलाला नकळत लागलेले नशेली पदार्थाचे व्यसन पूर्ण संसार उध्वस्त करून टाकत. प्रथम पोलीस ठाण्यात दाखल होणार गुन्हा त्यानंतर त्याची सुटका हा हृदयस्पर्शी प्रसंग, त्यातूनही न सावरणारा हा मुलगा पूर्ण व्यसनाधीन होऊन जगाचा निरोप घेतो. व याच धक्क्याने त्याचे वडीलही प्राण सोडतात! जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही याच मालवणी म्हणीचा आधार घेत सात मिनिटांची ही चित्रफीत जिल्ह्यातील स्थानिक कलाकारानी भावनिक व हृदयस्पर्शी बनवली आहे.