कै. दर्पण नानचे यांच्या आठवणी प्रित्यर्थ सन २००१ “शाळेतील आठवणी ग्रुप’ चे आयोजन
कणकवली | मयुर ठाकूर : येथील समता सेवा संघ मुंबई संचलित ल. गो. सामंत विद्यालय आणि अशोक मधुकर पावस्कर कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवारी एसएससी बॅच २००१ च्या “शाळेतील आठवणी ग्रुप’ने बॅचमधील मित्र कै. दर्पण नानचे यांच्या आठवणी प्रित्यर्थ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. छत्री, वह्या असे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले. साधारणपणे ५० हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य व शाळेला देणगी देण्यात आली.
याप्रसंगी हरकुळ बुद्रुक समता सेवा संघाचे कार्याध्यक्ष मोहमद हनीफभाई पटेल, सदस्य बाबासाहेब वरदेकर सुनील घाडीगावकर तसेच एसएससी २००१ च्या बॅचचे विद्यार्थी बापू वाडेकर, प्रमोद भोगटे, दीपक मेस्त्री, शितल पेडणेकर, श्रीम. सुप्रिया दर्पण नानचे, मुन्ना पटेल आदी उपस्थित होते.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नेवाळकर यांनी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत व कार्यक्रमाचे प्रस्तावित केले. तर सौ. तांबे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.