3.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

‘तहसील’कडून एप्रिलपासून ३३०० दाखले वितरित

कणकवती | मयुर ठाकूर : दहावी, बारावीचे निकाल जाहीर होताच विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी कार्यालयांमध्ये पालक तहसील विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. उत्पन्न दाखल्यापासून ते वय अधिवास, नॉन क्रिमिलेअर, जात प्रमाणपत्र आदी दाखल्यांसाठी पालक महसूल विभागाकडे धाव घेतात, कणकवली तहसील कार्यालयाकडून यावर्षी एप्रिलपासून अशा प्रकारचे सुमारे ३३०० दाखले वितरित करण्यात आले आहेत. तसेच अजूनही दाखले वितरणाचे काम सुरू आहे.

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रवेश व इतर कामांसाठी आवश्यक असलेले दाखले तातडीने देण्याच्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तहसील कार्यालयाकडून हे दाखले तातडीने देण्याच्या अनुषंगाने पावले उचलण्यात येत आहेत. दाखल्यांमध्ये त्रुटी असल्यास त्याबाबतही पूर्तता करून घेत दाखले वितरित करण्यात येत आहेत.

एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत तहसील कार्यालयाकडून विविध प्रकारचे ३३०१ एवढे दाखले वितरित करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक दाखले हे उत्पन्नाचे आहेत. या कालावधीत २११८ उत्पन्नाचे दाखले वितरित करण्यात आले. निवासी दाखले ३७, तर वय अधिवासचे ३९२ दाखले या कालावधीत वितरित करण्यात आले आहेत. जातीचे दाखले ३३०, नॉन क्रिमिलेअर ३५३, तर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ६० जणांना वितरित करण्यात आले आहेत. शिवाय ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रं ८, कुटुंब सहाय्य योजना ३ असेही दाखले देण्यात आले आहेत.

विद्यार्थी ब अत्यावश्यक कामांना दाखले मिळण्यासाठी अर्ज आल्यानंतर कागदपत्रं पडताळणी करून तातडीने कार्यवाही करण्यात येते. निवडणूक धामधुमीच्या कालावधीतही हे दाखले तातडीने सही होऊन जाण्यासाठीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. त्यामुळे प्रलंबित दाखल्यांचे प्रमाण बंद झाले आहे. याबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!