22.5 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

वैभववाडी – नावळे मार्गावर कोसळले झाड : वाहतूक ठप्प

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात काही दिवसाच्या हजेरीनंतर पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखवाला आहे. मात्र या दमदार पावसाने वैभववाडी – नावळे मार्गांवर नगरपंचायत हद्दीत सांगुळवाडी कृषी येथे रस्त्यावर झाड पडल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनाच्या लांबचंलांब रांगा लागल्या होत्या. आपत्ती व्यवस्थापन उशिरापर्यंत घटनास्थळी दाखल झाली नव्हती. अखेर ग्रामस्थांनी झाड तोंडून रस्ता मोकळा केला.

काही दिवसाच्या विश्रांतीनंतर गुरुवारी दुपारपासून तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात झाली.  दुपारी ३  वा. सुमारास या पावसाने सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाजवळ रस्तावर झाड उमळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत ग्रामस्थांनी नगरपंच्यातीला माहिती दिली.  नगरपंचायतीचे कर्मचारी दाखल झाले परंतु झाड हटविण्यात त्यांना यश आले नाही. अखेर सांगुळवाडी ग्रामस्थांनी गावातून कट्टर मशीन आणून झाड तोडून रस्ता मोकळा केला. त्यानंतर सुमारे दीड तासानंतर वाहतूक सुरु करण्यात आली

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!