0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

कै. श्रीधरराव नाईक यांचा २२ जून रोजी ३३ वा स्मृतीदिन होणार साजरा

सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन ; श्रीधरप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन

कणकवली | मयुर ठाकूर : कै. श्रीधरराव नाईक यांचा ३३ वा स्मृतीदिन शनिवार २२ जून २०२४ रोजी कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक येथे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सकाळी ९ वाजता रक्तदान शिबीर होणार आहे. ९.३० वा. कै. श्रीधर नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. सकाळी १० वा. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच जेष्ठ नागरिक व महिला बचत गटांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत,आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख उपनेते अरुण दुधवडकर,उपनेते गौरीशंकर खोत,ब्रिगेड सुधीर सावंत,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव,बाळा भिसे,आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


कै. श्रीधरराव नाईक हे दानशूर आणि परोपकारी व्यक्तिमत्व म्हणून जनसामान्यात लोकप्रिय होते. कै. श्रीधर नाईक यांनी समाजकारणातून समाजात आपला वेगळा ठसा उमटवला होता. गेली ३३ वर्षे सातत्याने कै. श्रीधरराव नाईक फाउंडेशनच्या वतीने कै. श्रीधरराव नाईक यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात येतो. श्रीधर नाईक प्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित असतात यापूर्वी वृक्षारोपण,चित्रकला, निबंध स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, शैक्षणिक व सामाजिक संस्थांना मदतकार्य असे अनेक सेवाभावी कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यामाध्यमातून कै श्रीधर नाईक यांच्या स्मृती नाईक कुटुंबीयांनी जागृत ठेवल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील स्मृतिदिन साजरा करण्यात येणार असून श्रीधर प्रेमींनी स्मृतिदिन कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन श्रीधर नाईक फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!