24.5 C
New York
Wednesday, July 2, 2025

Buy now

फोंडाघाट चेक पोस्टवर कार मध्ये सापडली ३८ लाखांची रोकड

कणकवली : फोंडाघाट चेक पोस्ट वर सावंतवाडी हून कोल्हापूर च्या दिशेने जात असलेली कार १९ जूनला रात्री साडे आठ च्या सुमारास चेक पोस्टवर आली असता तेथे कार्यरत असलेले नितीन बनसोडे व सागर देवार्डेकर यांनी तपासली. या कार मध्ये सुमारे ३८ लाख ६७ हजार रोख रक्कम आढळून आली. कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मारुती स्विफ्ट कार (एम एच ०९ एफ व्ही ४०७८) मधून रोकड मिळाल्याची माहिती मिळताच पी एस आय अनिल हाडळ आणि पी एस आय शेगडे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कार मधील दोन्ही संशयिताना समर्पक उत्तरे देता येत नसल्याने महसूल च्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!