25.8 C
New York
Thursday, July 25, 2024

Buy now

गाबीत समाजातर्फे ७ जुलै रोजी गुणवंतांचा सत्कार

मालवण : दहावी आणि बारावी परीक्षा २०२३ – २४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील सर्व गाबित विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा गुणगौरव समारंभ ७ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रती ३० जूनपर्यंत आपआपल्या भागातील कार्यकारिणी सदस्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर यांनी केले आहे.

तालुका गाबित समाज कार्यकारिणीची गुणगौरव समारंभ नियोजन बैठक गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्थेत आज १९ जून रोजी पार पडली. नावनोंदणी अध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, पवनकुमार पराडकर – आचरा. आनंद खडपकर – तळाशील, गंगाराम. आडकर – सर्जेकोट/कोळंब. मालवण शहर -भाई कासवकर आणि अनुष्का मालंडकर (धुरीवाडा). नरेश हुले, पूजा सरकारे, दादा वाघ, राधिका कुबल (मेढा-राजकोट). सेजल परब, अन्वेषा आचरेकर आणि भाऊ मोरजे (दांडी). मिथुन मालंडकर आणि संतोष ढोके (वायरी). सहदेव साळगावकर (तारकर्ली-देवबाग). दिक्षा ढोके (भरड) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!