-4.6 C
New York
Wednesday, January 15, 2025

Buy now

खा. नारायण राणे यांचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी केले अभिनंदन

कणकवली पिडब्ल्यूडी विभागाच्या कामांचे खा. नारायण राणेंकडून कौतुक

कणकवली | मयुर ठाकूर : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांची पिडब्ल्यूडी कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेत अभिनंदन केले.

यावेळी कणकवली उपअभियंता के. के. प्रभू, वैभववाडी उपअभियंता विनायक जोशी उपस्थित होते.

नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांना पिडब्ल्यूडी च्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांची कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी माहिती दिली. पूर्णत्वास गेलेला कनेडी फोंडाघाट राज्यमार्गाचे रुंदीकरण, नूतनीकरण, कणकवली जानवली चा विकाससेतू ठरणारा जानवली नदीवरील शीघ्रगतीने सुरू असलेले पुलाचे काम, प्रलंबित असलेला सोनवडे घाटरस्ता, मालवण देवगड कणकवली तालुक्यातील अद्ययावत झालेली रेस्ट हाऊस, कणकवली रेल्वे स्थानक नूतनीकरणचे पूर्णत्वाकडे जात असलेले अद्ययावत काम आदींसह अन्य विकासकामांची माहिती अजयकुमार सर्वगोड यांनी खा. नारायण राणेंना दिली. पिडब्ल्यूडी कणकवली विभागाच्या कामाबाबत खा. नारायण राणे यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!