नवागतांचे उत्स्फूर्त स्वागत ; शाळा परिसरात केले वृक्षारोपण
मालवण : राज्यातील शाळा आजपासून गजबजल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत तसेच सर्व विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तालुक्यातील चिंदर सडेवाडी प्राथमिक शाळा येथेही प्रवेशोत्सव निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. दरम्यान विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. तसेच शाळा परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, शालेय व ग्रामविकास समिती उपाध्यक्ष तथा चिंदर सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण कांबळी, उपाध्यक्ष अंजली गोसावी, शाळा शिक्षक शुभांगी लोकरे-खोत, श्रीमती गायकवाड तसेच श्री. पोटघन, माजी अध्यक्ष श्रद्धा सुर्वे, शिवानी हडकर, सिद्धेश गोलतकर, प्रीती कांबळी, धनश्री गोसावी, अंगणवाडी सेविका, मदतनीस मानसी गोसावी, अमित मुळे, स्वाती सुर्वे, प्रियांका वराडकर, हळदणकर, श्री. राजभार, श्री. गोसावी, श्री. घागरे यांसह पालक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थी, मान्यवर, शिक्षक, पालक यांचे स्वागत सत्कार करण्यात आला.