19.6 C
New York
Wednesday, October 15, 2025

Buy now

कणकवलीत बॅनरबाजीवरून राजकारण तापले !

शिवसेनेच्या इशाऱ्याला प्रती इशारा

कणकवली :  शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर लागलेला “वक्त आणि दो जवाब भी देंगे” अशा आशयाचा इशारा देणारा बॅनर चर्चेचा विषय बनलेला असतानाच आता याच बॅनर ला त्याच “स्टाईल” ने उत्तर देणारा बॅनर चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीच्या नारायण राणे यांच्या विजयी रॅलीत आमदार नितेश राणे यांचा गुलाल उडवतानाचा फोटो वापरून लावलेल्या या बॅनरवर शिवसेनेकडून दिलेल्या इशाऱ्याला त्याच स्टाईलने उत्तर देण्यात आले आहे. “हमारा वक्त आया है, तुम्हारा वक्त आने भी नही देंगे, तुम्हारे ही इलाके मे आके तुम्ही ही जवाब देंगे”! असा खास स्टाईल मधला इशारा देत हा बॅनर लावण्यात आला आहे. या निमित्ताने कणकवली मध्ये महायुती मधील धुसफूस चव्हाट्यावर आली असून, शिवसेनेने दिल्याने इशाऱ्याला भाजपने या बॅनर मधूनच उत्तर दिल्याने कणकवलीत रंगलेला हा बॅनरवार सध्या चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान या दोन्ही बॅनर मुळे कणकवलीतील वातावरण पुन्हा राजकीय दृष्ट्या तापले असून, आता या बॅनर युद्धाचा एंड कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!