13 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

करुळ येथील पोलीस तपासणी नाक्यानजीक दरड रस्त्यावर

करुळ घाटमार्गातही दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच

वैभववाडी : करूळ घाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. तसेच करूळ पोलीस तपासणी चेक नाका नजीक रात्री भल्यामोठ्या दरडी रस्त्यावर पडल्या आहेत. रहदारीच्या ठिकाणी दरडी कोसळत असल्याने गावातील वाहन चालक व नागरिकांना प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

तरेळे ते गगनबावडा या राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सहा महिन्यापासून सुरू झाले आहे. रस्ता रुंदीकरणासाठी चार महिने करुळ घाट बंद ठेवण्यात आला आहे. ठरलेल्या कालावधीत रस्ता न झाल्याने अध्यापही मार्ग बंदच आहे. त्यामुळे वाहन चालकात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. घाट मार्ग वाहतुकीसाठी त्वरित चालू करा अशी मागणी देखील केली जात आहे.

सद्यस्थितीत करूळ गावातील काही वाड्या या घाटपायथ्या नजीक आहेत. पोलीस चेक नाका, घाटपायथा ते दिंडवणेवाडी दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. परंतु रस्त्याच्या डोंगराकडील भागात दरड व मातीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात झाल्याने दरडी वारंवार रस्त्यावर कोसळत आहेत. त्याचबरोबर घाटात देखील मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू आहे. रहदारीच्या ठिकाणी दरडी कोसळत राहील्यास दुर्घटना घडू शकते. यावरती संबंधित यंत्रणेने तात्काळ उपायोजना करावी. अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!