प्रभारी नंदकुमार काळे यांनी चांगले काम केल्याची सर्वांची प्रतिक्रिया
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : सिंधुदुर्गचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून विजय गणपत काळे यांची शासनाने नियुक्ती केली असून त्यांनी या पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला. सन २०२१ पासून हे पद रिक्त होते. या पदाचा प्रभारी कार्यभार सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांनी चांगल्या पद्धतीने हाताळला होता. नव्याने हजर झालेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे जालना उपप्रादेशिक कार्यालयातून या जिल्ह्यात बढतीने आले आहेत. सन २०१६ रोजी त्यांची सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.
सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मुख्य म्हणून पदावर नंदकुमार काळे यांनी गेली दोन वर्ष चांगले काम केले होते. वाहन चालक मालक यांच्यासाठी नव्याने सुरू झालेली ऑनलाइन प्रणाली व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळणारी सेवा नागरिकांना सुलभपणे उपलब्ध झाले होती. रस्ता सुरक्षा व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नंदकुमार काळे यांनी पोलीस प्रशासन जिल्हा महसूल प्रशासन पत्रकार नागरिक वाहन चालक वाहन मालक स्वयंसेवी संस्था आधी सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून या जिल्ह्यात चांगले काम केले आहे. या पदाला त्यांनी चांगला न्याय दिला होता. अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. आता ते याच जिल्ह्यात सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून मूळ पदावर काम करणार आहेत.