सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : हवामान खात्याकडून “रेड” अलर्ट जाहीर केलेला असताना आज दुपार पासून सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने सुरुवात केली. गडगटात किंवा वीजा वगळता जोराचा पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्ते, शेती आदी परिसरात पाणीच पाणी झाल्याचे चित्र होते. कोकणात दाखल झालेल्या मान्सून ने जोरदार बसण्यास सुरुवात केली. गेले काही दिवस रिमझिम पाऊस पडत होता तर काही ठिकाणी पाऊस तर बऱ्याच ठिकाणी ऊन अशी परिस्थिती निर्माण होती. परंतु आज दुपारपासून पावसाने आपला जोर वाढवला आहे.
यंत्रणांना महत्वाच्या सूचनाही
१) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलसर्व यंत्रणांनी अलर्ट रहावे.
२)सर्व यंत्रणा प्रमुखांनी स्वतः तसेच आपले अधिनस्थ अधिकारी/कर्मचारी यांना वीज पडण्याची सूचना देणारे दामिनी ॲप आणि अतिवृष्टी बाबत सूचना देणारे सचेत ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊन लोड करण्यास सांगावे.
३)अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपले नियंत्रण कक्ष अलर्ट मोड वर ठेवावेत आणि कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची त्वरित माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी.