सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : लोकसभा निवडणुकीत मागील दोन टर्म मध्ये खासदार असलेले राऊत यांनी जिल्ह्यात कोणतीच काम केली नव्हती. मतदारांमध्ये याची नाराजी होती. केवळ भावनिक साथ घालून अन्याय झाला यावर फक्त उ.बा.ठा. गटाने मत मागीतली होती. परंतु कोकण वासीयांनी याला कोणतीच भिक न घालता, जिल्ह्यातील विकासाचा मुद्दा घेऊन राणे यांना संधी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बिनशर्त पाठिंबा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्या सोबत खांद्याला खांदा लावून मा. राज साहेबांच्या आदेशाचे केलेले पालन, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मा. राज साहेब ठाकरे यांची सभा विजयाचा बुस्टर डोस ठरली…. त्या मुळे आजच्या राणे यांच्या विजयाच्या निर्णायक मतामधे मनसेचा मोलाचा वाटा…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण नेते शिरीष सावंत ,अविनाश जाधव ,निरीक्षक संदीप दळवी ,गजानन राणे यांनी प्रचारा संबंधी मेहनत घेतली, मार्गदर्शन मनसे कार्यकर्त्यांना केले होते. सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी यांच्याकडून राणे यांना शुभेच्छा..