सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : निवडणुकीपूर्वी आतुरता लागली होती ती रत्नागिरी – सिंधुदुर्ग चा महायुतीचा उमेदवार कोण असणार. मात्र महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आज ४ जून रोजी या झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. पहायला गेलं तर सध्या दोन्ही उमेदवारांमध्ये पाचशे हजार मतांचा फरक सुरुवातीला दिसून येत होता. मात्र आताच्या घडीला मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना साधारणपणे सातव्या फेरीमध्ये १४ हजार २४१ मताधिक्य मिळालेले आहे. एकूणच या संपूर्ण वातावरणानंतर रत्नागिरीत भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकमेकाला पेढे भरवत नारायण राणेंच्या विजयाची पहिली नांदी सुरू केली. त्यानंतर हळूहळू या विजयाच्या नांदीचे आता सिंधुदुर्ग देखील पडसाद उमटू लागले आहेत. काहींनी आपल्या व्हाट्सअप ला स्टेटस लावला असून विजयी भव : असा मेसेज देखील दिला आहे. त्यामुळे आता येणारा अंतिम निकाल काय असणार आणि नेहमीच चर्चेत राहिलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात गुलाल कोणाचा उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.