3.2 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

बनावट पत्रे वापरून पथदीपांचे काम | महावितरणची फसवणूक

तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदारावर गुन्हा

कणकवली : सन २०१७ ते २०२२ या कालावधीत सावडाव येथील पथदीपांचे काम करताना महावितरणची परवानगी न घेता संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदाराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची तक्रार महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विलास यशवंतराव बगडे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. सावडाव गावठणवाडी ते सावडाव धबधबा यादरम्यान तेलीवाडी, टेंबवाडी, डगरेवाडी, खांदारेवाडी, झरवाडी, पुजारेवाडी परिसरात पथदीप बसविण्यात आले. हे काम करताना महावितरणची परवानगी न घेता बनावट पत्रे वापरत पथदीपांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे सावडावचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक तसेच श्री प्रेम इंडस्ट्रीजचे सुभाष भंडारे यांनी संगनमताने महावितरणची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी तक्रार दिली असून, त्यावरून विविध कलमांद्वारे पोलिसांनी त्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!