कुडाळ : मी मागील पाच – पन्नास वर्षे राजकारणात घालवली. आमचे पण काही अंदाज आहेत. आम्ही पण निवडणूक लढवली आहे. आम्ही निवडणूकीत नामधारी नाही तर सक्रिय होतो, त्यामुळे एक्झिट पोल कडे मी पाहत नाही, माझा विजय निश्चित आहे अशी स्पष्ट प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली.
कुडाळ येथील गुलमोहर हाॅल येथे पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची आढावा बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीनंतर ना.राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ना.राणे म्हणाले की, महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे असल्याचे पक्षाकडून सांगतले गेले आहे. बाकी कोणाचे कोण आहेत याची माहिती माझ्याजवळ नाही. तर काँगेसची सत्ता येत नसल्याने एक्झिट पोलच्या विश्लेषणात सहभागी होणार नाही. राहुल गांधी यांच्या निवडणुकीच्या भाषणात महिलांना एक लाख रुपये देणार सांगत होते. मात्र, मागील ६०-६५ वर्ष सत्तेत होते तेव्हा काही दिले नाही. आता तर त्यांना कळून चुकले आहे की आपण सत्तेत येत नाहीत.आमच्या महायुतीत कोणताही विवाद नाही. छगन भुजबळ यांनी आपले मत मांडले आहे. त्यांचे वरिष्ठ त्यांच्याशी बोलत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत आहे. कोणी बोलून काही होत नाही. भुजबळ महायुतीतील मंत्री आहेत. एखादी जनहिताची गोष्ट असल्याचं केंद्राकडे कसे आणि कुठे बोलावे हे त्यांना माहिती आहे, असे छगन भुजबळ यांच्या कांदा प्रश्नावर नारायण राणे यांनी मत व्यक्त केले.
मला उद्याच्या होणाऱ्या मतमोजणी आणि निकालाबाबत धाकधूक वाटत नाही. उत्सुकता कशाला मी विजयी होणार आहे. मला विजयाची १०० टक्के खात्री आहे. तर कार्यकत्यांनी रॅलीची तयारी केली असल्याचे ना.राणे यांनी सांगितले मात्र महाराष्टातील ४८ पैकी किती जागा येतील यावर त्यांनी उत्तर देणं टाळले.