8.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

शिवसेनेचे नाव सांगून बचाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करा

आर्जु टेकसोल फसवणूक प्रकरणी पालकमंत्री उदय सामंत यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना

रत्नागिरी : मिरजोळे एमआयडीसी येथे आर्जू टेकसोल कंपनीमध्ये झालेली फसवणूक आणि त्यानंतर उठलेले वादळ यावर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी रोखठोक भूमिका घेतली असून काहीजण शिवसेनेचे नाव सांगून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत हे कधीही खपवून घेतले जाणार नाही. उलट अशा व्यक्तींवर तर कडक कारवाई करा, अशा कडक सूचना ना. उदय सामंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लाखो रुपयांची फसवणूक अनेकांची झाली असून सर्वसामान्यांना पैसे परत मिळणे गरजेचे आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी यावर संवाद साधत जनतेला दिलासा दिला आहे. बुधवारी झालेल्या पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात आर्जू कंपनीच्या फसवणुकीवरती जिल्हा पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली.

यामध्ये गुंतलेल्या सर्वांवर कारवाई होताना जनतेचे पैसे परत मिळाले पाहिजेत या दृष्टीनेही आदेश देण्यात आले आहेत. याची व्याप्ती मुंबई, पुणेबरोबर दिल्लीपर्यंत पोहोचली असून त्याची संपूर्ण चौकशी खोलवर केली जाणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!