आमदार नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
अपघात रोखण्यासाठी उपाय योजना बाबत घेतली अधिकाऱ्यांची बैठक
गगनबावडा घाटाचे काम एक जून पर्यंत पूर्ण करा
कणकवली : महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे तालुक्यातील जानवली येथे सातत्याने अपघात होत आहे. या अपघातात निरपराधांचे बळी जात आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीने आवश्यल त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाहनांचा वेग नियंत्रित राहावा यासाठी ठिकठिकाणी गतिरोधक आणि माहिती फलक लावणे आवश्यक आहेत, अशा सूचना कणकवली / देवगड -वैभववाडीचे आ. नितेश राणे यांनी अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या.
मुंबई गोवा महामार्गवर अपघात होता नये, लोकांचे जीव जाता नये, याकरिता योग्य त्या उपाययोजना करा. वर्दळीच्या ठिकाणी वाहनाची गती नियंत्रित राहील अशा पद्धतीने महामार्गावर उपयोजना केल्या जाव्यात, अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ओम गणेश निवासस्थानी आ. नितेश राणे यांनी महामार्गावरील समस्या, होणारे अपघात आणि अपूर्ण असलेली कामे याविषयी बैठक घेतली.
या बैठकीला महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अतुल शिवनिवार, के.सी.सी. बील्डकॉन व दिलीप बिल्डकॉन कंपनीचे श्री. पांडे, गगनबावडा घटाचे कंत्राटदार श्री वेल्हाळ, भाजपचे पदाधिकारी बाळ जठार, दिलीप तळेकर, भालचंद्र साटे, खारेपाटण सरपंच प्राची इस्वलाकर, संकेत शेट्ये, तळेरे सरपंच, शिवसेनेचे बबन शिंदे, दामू सावंत, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी वैभववाडी गगनबावडा घाटातचे काम एक जून पर्यंत पूर्ण करा. कोणतीच कारणे नको अशा सूचना गगनबावडा घाटाचे काम करत असलेल्या कंत्राटदाराला दिल्या.