8.8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

हरकुळ बुद्रुक येथील नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केली पहाणी

आमदार नितेश राणे यांनी तातडीने पंचनामे करण्याची केली होती मागणी

कणकवली : वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा हरकुळ बुद्रुक गावातील शेखवाडी व खडकवाडीला मोठा फटका बसला होता. पाऊस व जोरदार वादळामुळे भागातील अनेकांच्या घराचे छप्पर उडून गेले आहे. तर विद्युत तारा व पोल कोसळुन मोठे नुकसान झाले.

शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी
किशोर तावडे यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

किशोर तावडे यांनी नुकसानग्रस्तांची चर्चा केली. विदुयुत पुरवठा खंडित झाल्यामुळे शेखवाडी व खडकवाडीला होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. शुक्रवारी सकाळापासून महावितरणकडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते.

फोटो – हरकुळ बुद्रुक येथील नुकसानग्रस्त भागाची पहाणी करताना जिल्हाधिकारी किशोर तावडे व अन्य. ( छाया : मयुर ठाकूर, कणकवली )

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!